साहित्य
सोललेली कोलंबी- १ वाटी
१/२ नारळ खोवून
हळद- १ छोटा चमचा
तिखट- २ चमचे (आवडीप्रमाणे)
कांदा- १ /२ बारीक़ चिरून
कांदा- १/२ वाटण्यासाठी
आम्बट पणासाठी - चिच,कोकम किंवा कैरी
मीठ- चवीनुसार
कृती
कोलंबी सोलून मीठ लावून ठेवावी
खोबरे,हळद,तिखट आणि कांदा मिक्सर मधे वाटावा।
तेलावर कांदा फोडणीला घालून त्यावर कोलंबी घालावी.थोड़ी परतून त्यावर थोड़े पाणी घालावे। मग वाटण घालावे। एक उकळी आल्यावर कोकम घालून थोड़े मीठ हवे असल्यास घालावे। गैस बंद करावा।
Sunday, February 28, 2010
सोलाची कढी
ही सारस्वतांची खासियत.हल्ली सोलाची कढी सगळीकडे माहित झाली आहे. कोकणामधे नारळ आणि कोकम भरपूर। शिवाय हवामान उष्ण म्हणूनच बहुतेक सोलाच्या कधीचा शोध लागला असावा. कारण उन्हाळ्यात पित्ताचा त्रास कमी व्हावा यासाठी सोलकढी हा उत्तम उपाय।
सोलाच्या कढीसाठी साहित्य
खोवलेला नारळ-१ वाटी
लसूण पाकळ्या -२-३
कोकम/सोले-४-५
मीठ- चवीप्रमाणे
हिरवी मिरची-१/२
कोथिम्बिर- २ चमचे ( चिरून)
कृती
एक भांड्यात १/२ कप पाणी घेउन त्यात सोले आणि मीठ घालावे. मिक्सर वर खोबरे आणि लसूण, हिरवी मिरची बारीक़ वाटावे.वाटताना थोड़े पाणी घालावे.त्याचा रस काढून तो गाळून कोकम भिजवलेल्या पाण्यात घालावा.अजून एकदा थोड़े पाणी घालून पुन्हा तेच रस काढलेले खोबरे वाटावे.आणि पुन्हा रस काढावा. वरून चिरलेली कोथिम्बिर घालावी.यात variation करताना हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट घातले तरी कढीला छान रंग येतो.( जर सोलांचा रंग कमी झाला तर अशी कढी करावी)। याच कढीला वरून हिंग मोहरीची किंवा ओव्याची फोडणी दिली तरी छान चव येते. फोडणीत लाल सुकी मिरची ही घालतात. लासनिच्या ऐवजी वातानत ओवा घातला तरी चालतो। कधी कधी जिरेही घालतात.
नारळाचा रस न घालता सुद्धा कढी करता येते त्याला 'तिवाळ' किंवा फूटी कढी असे म्हणतात। त्यात सोले आणि मिथ घातलेल्या पाण्यात एक हिरवी मिरची उभी चिरून घालायची। थोडा हिंग घालायचा आणि चिरलेली कोथिम्बिर घालायची.ही सुद्धा भाताबरोबर खातात.
Sunday, January 17, 2010
सारस्वती मटण
साहित्य
मटण- १ किलो
कांदे-७-८
सुक्या खोबर्याचा किस-१ वाटी
धने- २ चमचे
मिरी-७-८
लवंग ४-५
दालचीनी-१ इंच
खसखस-१ चमचा
बडीशेप-१ चमचा
जायफळ पावडर-पाव चमचा
आले, लसूण, कोथिम्बिर आणि हिरवी मिरचीचे वाटण- मट्णाला फासण्यासाठी
धने-मिरचीचा सारस्वती मसाला-२ चमचे
सुक्या मिरच्या -३-४
कृति
मटण नीट धुवून घ्यावे। त्याला हळद आणि हिरवे वाटण लावून १०-१५ मिनिटे ठेवावे । कुकरमधे व्यवस्थित शिजवावे । ४ कांदे बारीक़ चिरून तेलावर फोडणीला घालावे। साधारण रंग बदलला की त्यावर शिजलेले मटण घालावे । थोड़े गरम पाणी घालावे। झाकण ठेवून मध्यम गँसवर शिजत ठेवावे।
दुसऱ्या बाजूला तव्यावर थोड्या तेलात लवंग,दालचीनी,धने,मिरी,खसखस ,बडीशेप,जायफळ भाजून घ्यावे ते झाल्यावर त्याच तेलात सुक्या मिरच्या, २-३ उभे चिरलेले कांदे ,सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे। आणि सर्व मिक्सरवर बारीक़ वाटावे।
हे वाटण शिजत असलेल्या मटणावर घालावे । वरून सारस्वत मसाला घालावा। चांगले शिजल्यावर मीठ घालावे.
गरम भाकरी आणि मटण आणि लिम्बाची फोड़ । झककास .
Thursday, January 14, 2010
माशाची आमटी
साहित्य
पापलेट , सुरमई, रावस यापैकी बाजाराचे तुकडे - ४-५
कांदा पाव वाटी - बारीक़ चिरून
ओले खोबरे किस -अर्धी वाटी
मिरी-४ दाणे
चिरलेला कांदा २ चमचे
चिचेचे बोटभर तुकडा किंवा सोले (कोकम)-२-३
हळद
तिखट
तान्दूळ १ चमचा (पाण्यात भिजवून)
तेल आणि मीठ
कृति
बाजाराच्या तुकडयाना स्वच्छ धुवून मीठ, हळद तिखट लावून ठेवावे (साधारण १०-१५ मिनिटे)
एक भांड्यात २ चमचे तेल घालून त्यात चिरलेला कांदा परतावा साधारण लाल जाला की त्यात बाजाराचे तुकडे घालावेत। गरजेप्रमाने हळद ,तिखट घालावे .अलगद पणे परतून त्यात अर्धी वाटी पानी घालावे. ओले खोबरे, मिरी, थोडा कांदा, भिजलेले तान्दूळ आणि चिंच यांचे मिक्सेरमधे वाटलेले बारीक़ वाटण घालावे। एक उकाली काढावी चविप्रमाणे मीठ घालावे। गैस बंद करावा ( चिंचे ऐवजी सोले घालायची असल्या
हीच आमटी रसाची करायची झाल्यास आधी चिच आणि ओले खोबरे यांचा रस थोड़े पानी घालून काढून घ्यावा. तुकडे अलगद परतल्यावर त्यावर हा रस घालावा आणि नंतर मिरी,कांदा खोबर्याचे बारीक़ वाटण घालावे
गरमागरम भात, बाजाराची आमटी आणि सोलाची कढी हा सारस्वतांचा weak पोइंट
बरोबर तळलेले तुकडे असतील तर मग काय विचारूच नका
Subscribe to:
Comments (Atom)