साहित्य
पापलेट , सुरमई, रावस यापैकी बाजाराचे तुकडे - ४-५
कांदा पाव वाटी - बारीक़ चिरून
ओले खोबरे किस -अर्धी वाटी
मिरी-४ दाणे
चिरलेला कांदा २ चमचे
चिचेचे बोटभर तुकडा किंवा सोले (कोकम)-२-३
हळद
तिखट
तान्दूळ १ चमचा (पाण्यात भिजवून)
तेल आणि मीठ
कृति
बाजाराच्या तुकडयाना स्वच्छ धुवून मीठ, हळद तिखट लावून ठेवावे (साधारण १०-१५ मिनिटे)
एक भांड्यात २ चमचे तेल घालून त्यात चिरलेला कांदा परतावा साधारण लाल जाला की त्यात बाजाराचे तुकडे घालावेत। गरजेप्रमाने हळद ,तिखट घालावे .अलगद पणे परतून त्यात अर्धी वाटी पानी घालावे. ओले खोबरे, मिरी, थोडा कांदा, भिजलेले तान्दूळ आणि चिंच यांचे मिक्सेरमधे वाटलेले बारीक़ वाटण घालावे। एक उकाली काढावी चविप्रमाणे मीठ घालावे। गैस बंद करावा ( चिंचे ऐवजी सोले घालायची असल्या
हीच आमटी रसाची करायची झाल्यास आधी चिच आणि ओले खोबरे यांचा रस थोड़े पानी घालून काढून घ्यावा. तुकडे अलगद परतल्यावर त्यावर हा रस घालावा आणि नंतर मिरी,कांदा खोबर्याचे बारीक़ वाटण घालावे
गरमागरम भात, बाजाराची आमटी आणि सोलाची कढी हा सारस्वतांचा weak पोइंट
बरोबर तळलेले तुकडे असतील तर मग काय विचारूच नका
No comments:
Post a Comment